Wednesday, December 7, 2011

AWSURVEYS

सर्वे करण्याची ही एक मस्त पध्दत आहे यात वेबसाईट्स दिलेल्या असतात आणि त्या वेबसाईट्स बद्दल ३ वाक्यांमध्ये माहितई द्यायची असते साईन अप केल्यानंतर सहा डॉलर्स मिळतात। करुन पाहायला काहीही हरकत नाही.

6।00 Welcome Survey After Free Registration!





Sunday, January 9, 2011

मराठी+इंग्रजी बोलणे कितपत योग्य?

मराठी किती जणांना अगदी १०० टक्के येते हा प्रश्न जर विचारला तर त्याचे उत्तर मला तरी शून्य टक्केच वाटते . याचे कारण आपल्या सभोवताली जरा नजर टाकली तरी लगेच लक्षात येईल आणि सभोवतीच कशाला आपल्यावर सुध्दा नजर टाकली तरी समजेल. कारण आपणसुध्दा त्याच कॅटेगरीत (बघा! परत इंग्रजी) मोडतो. आपले काम इंग्रजी शब्दांशिवाय भागतच नाही का! दैनंदिन जीवनात कित्ती इंग्रजी शब्दांचा वापर आपण करत असतो. उदा. टेबल, पेन, ड्रेस, कम्प्युटर, पिन, प्लग, फ़्रिज, किचन इ. अशा भरपुर शब्दांची यादीच वाढेल आणि या शब्दांना पर्यायी शब्द शोधणे म्हणजे डोकेमारीच असे आपल्याला वाटते. इतर शब्द फ़ार लवकर लक्षातही येत नाही आपल्या कारण या शब्दांची सवयच पडलेली असते ना आपल्याला! पण हे शब्द इतक्या सहजासहजी सुटणारही नाहीत आपल्या जीवनातुन तर मग करायचे तरी काय? हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही. दुर कशाला जाता आपल्या ब्लॉगरचं बघा. आपण मराठी ब्लॉग लिहितो पण त्यात सुध्दा किती शब्द असतात जे इंग्रजीतुनच असतात. ब्लॉग, पोस्ट, कमेंट्स, टेम्प्लेट्स इ. परंतु हे शब्द आपण जसेच्या तसे उच्चारतोच ना! कितीजणांना माहिती असेल की ब्लॉगला ’अनुदिनी’ म्हणतात.

ही पोस्ट (बघा!) या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी नाही तर जेव्हा दोन ’मराठी + मराठी’ व्यक्ती बोलतात त्यांच्यासाठी आहे. निदान तेव्हा तरी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करा ना! आपण वर उल्लेख केलेले शब्द मराठीत बोला असा माझा मुळीच आग्रह नाही. परंतु आपण "गुड मॉर्निंग, थॅंक्यु, बाय" असे नानाविध वचनं रोज बोलत असतो, एकमेकांना संदेश पाठवतो. काही सण आला तर "हॅपी दिवाळी, हॅपी दसरा" असे जे बोलत असतो किंवा मधुनच काही काम झाले नाही तर "शीट", "ऒ माय गॉड" असे शब्द वापरत असतो हे असं बोलणं तरी कमी करता येईलचं! आणि सवयीने कमीही करता येईल. हे असं बोलणं सोडूनच द्या असाही आग्रह नाही, जेथे गरज आहे तेथे नक्की वापरा. परंतु निदान दोन मराठी व्यक्ती एकत्र येतील तेव्हातरी नक्की कराच. खुप आनंद वाटेल मनाला.

Thursday, November 4, 2010

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व ब्लॉगर्सना दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा

Monday, October 18, 2010

ये रिश्ता क्या कहलाता है

स्टार प्लस वरील सर्व मालिकांची वैशिष्ट्ये म्हणजे "सास-बहु झगडा ही केमिस्ट्री"। परंतु त्यातही काही मालिका ह्या विशेष लक्ष वेधुन घेणाऱ्या आहेत। त्यातील एक म्हणजे सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणारी 'ये रिश्ता क्या कहलाता है'। काहींना वाटेल किती फ़डतुस पोस्ट आहे ही आणि तिही स्टार प्लस वरच्या मालिका। परंतु घाबरु नका मी काही ह्या मालिकेची स्टोरी ह्या इथे लिहीत नाहीए तर त्यातील एक सुंदर भजन डाऊनलोडींगसाठी देणार आहे जे मालिका न बघणाऱ्यांनाही जरुर आवडेल। ह्या मालिकेचे मुख्य पात्र म्हणजे "अक्षरा" ती नेहमी हे भजन म्हणते या मालिकेमध्ये। ते डाऊनलोड करा आणि नक्की ऎका आणि मग मला सांगा कसे वाटले ते.

O kanha

Wednesday, October 13, 2010

श्रवणीय हिंदी गाणं

नेटवर कधी कधी एखाद चांगलं गाणं मिळविण्यासाठी खूप खटपट करावी लागते। नवीन गाणे लवकर मिळतात त्यामानाने जुनी व अल्बमची गाणी शोधायला वेळ लागतो।कधी एखादं चांगलं गाणं मिळतही नाही त्यासाठी एका चांगल्या आणि श्रवणीय गाण्याची एक लिंक देत आहे सर्वांना ते नक्की आवडेलच!


"दिल का भोला है" हे त्या गाण्याचे बोल आहेत आणि ऎकायलाही मस्त आहे। कोणत्या चित्रपटातील आहे ते माहित नाही पण बहुतेक कोणत्यातरी अल्बमच असाव!

dil ka bhola hai

Monday, March 15, 2010

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व ब्लॉगर्सना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा





गुढीपाडव्याबद्दलची सर्व माहिती ह्या येथे नक्की नक्की वाचा.

Thursday, March 4, 2010

मराठी भाषेसंबंधी थोडेसे...

मराठी भाषेचा गोडवा सर्वज्ञात आहे. तो वेगळा वर्णन करण्याची गरज नाही. संत ज्ञानेश्वरांनी "ज्ञानेश्वरी" मध्ये मराठीची महती सांगितलेली आहे.

मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणारयांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा १३०० वर्षांपासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मीती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश द्वारे झाली आहे.मराठी भाषा भारतासह मॉरीशस व इस्त्राएल या देशातही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड येथेही बोलली जाते.

स्त्रोत - आर्कुट