Monday, March 3, 2008

जीवनात या तुझ्या............

जीवनात या तुझ्या संग माझा असू दे
कळीचे अस्तित्व माझे उमलून तिला फ़ुल होऊ दे
जीवनात या तुझ्या संग माझा असू दे
कोशामधुनि निघुन फ़ुलपाखरू मला होऊ दे
जीवनात या तुझ्या संग माझा असू दे
घरट्यायुनि निघुन पक्ष्यासारखे विहरू दे

Wednesday, February 20, 2008

आयुष्य

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ
नकामृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका,