Sunday, February 28, 2010

मैञी


मैञी ,मैञी म्हणजे काय ?

सर्वांनी आपली मते सांगितली,माझे मत जरासे असेच आहे.

मैञी : अनमोल नाते,

मैञी : प्रेमाचा ओलावा,

मैञी : सुख-दुःखे वाटून घेणे,

मैञी : आपुलकी,

मैञी : विश्वास,

मैञी : हक्काचे नाते,

मैञी : भरपूर, सांगतांना शब्द अपुरे
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

Saturday, February 27, 2010

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व ब्लॉग चालकांना व वाचकांना मोरपीस तर्फ़े
"मराठी भाषा दिनाच्या व होळीच्या हार्दिक शुभेच्छा".

माफ़ करा मला पोस्ट टाकायला फ़ार (म्हणजे फ़ारच) उशीर झालेला आहे. ११ नोव्हेंबर २००८ ला मी शेवटची पोस्ट टाकली होती. त्यानंतर आज म्हणजे मी फ़ारच ह्द्द पार केली. आपलं नेहमीचचं कारण ते म्हणजे मला वेळ मिळाला नाही. परंतु काळजी करू नका आता मोरपीस बरोबरच माझे दोन इंग्रजी ब्लॉग सुध्दा आहेत, तसेच मनातील फ़ुलपाखरासंगे आणि लवकरच तेही कार्यरत होणार आहे. मागच्या वेळी काही तांत्रिक कारणांमुळे (म्हणजेच टेम्प्लेट्समुळे) मोरपीसच्या काही पोस्ट डिलीट कराव्या लागल्या. त्या मी परत ब्लॉगवर टाकण्याचा प्रयत्न करीन. तसेच माझा टेम्प्लेट्सचाही एक ब्लॉग सध्या कार्यरत आहेच. तो सगळ्यांना माहिती आहेच. कोणता? माहीत नाही. त्याचं नाव आहे सुंदर टेम्पलेट्स. त्याच कामही जोरात सुरू आहे. त्यावरील छान छान टेम्प्लेट्स आपण फ़्री डाऊनलोड करू शकता.