Tuesday, October 7, 2008

तीन गोष्टी लक्षात ठेवा

तीन गोष्टी कुणाची वाट पाहत नाही
वेळ, मरण व ग्राहक

तीन व्यक्ती जीवनात एकाच वेळी मिळतात
आई, वडील व तारूण्य


तीन गोष्टी परत येत नाही
धनुष्यातील बाण, जिभेतील शब्द व शरीरातील प्राण

या तीनपासून सावध राहिले पाहिजे
वाईट संगत, स्वार्थ व निंदा

तीन गोष्टीत मन लावल्यास उन्नती मिळते
ईश्वर, मेहनत व विद्या

तीन गोष्टी कधी विसरू नये
कर्तव्य, कर्ज व मर्जी

तीन व्यक्तींचा आदर करावा
माता, पिता व गुरू

तीन गोष्टींवर नेहमी नियंत्रण ठेवा
मन, काम व लोभ