मी आज येथे एका अस्सल मराठी संकेतस्थळाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करीत आहे.मिसळपाव.कॉम ( http://www.misalpav.com/ ) हे अस्सल मराठी संकेतस्थळ आहे. येथे तुम्ही मराठी साहित्य, लेख आणि कविता वाचू शकता.येथे सद्यघटना व इतर विषयांवर चर्चा करू शकता.कुठल्याही विषयांवर लोकांचा कौल (ओपिनियन पोल) घेऊ शकता. साध्या सोप्या मराठीतून असलेले हे संकेतस्थळ आहे. येथे मराठी लिहीने अत्यंत सोपे आहे. जसे एखाद्या शब्दाचे इंग्रजी स्पेलींग होईल तसे टाईप केले की तो शब्द मराठी उमटतो. यालाच फोनोटीक टायपिंग असे म्हणतात. त्यामुळे येथे लिहायला शिकण्यासाठी दहा मिनीटे सुध्दा पुरे होतात. आपल्या भाषेत आपल्या भावनांना व्यक्त करण्यात जी मजा आहे ती काही औरच आहे. मात्र एवढंच नाही तर आपण लिहीलेल्या साहित्यावर, लेखावर व चर्चेवर ताबडतोब इतरांच्या प्रतिक्रिया वाचण्यात सुध्दा एक वेगळीच मौज आहे. तर अश्या ह्या संकेतस्थळाला भेट द्या आणि सामील व्हा एका आंतरजालीय मराठी प्रवाहात. तुम्ही नवीन असाल तर तेथे मराठी लिहीण्यासाठी किंवा इतर कुठल्याही बाबीसाठी काही मदत लागल्यास आधी तेथील वाविप्र म्हणजे FAQ वाचा. तेथे उत्तर नसेल तर मग सरळ चौकशी करा. तेथील लोक ताबडतोब मदत करतील.संकेतस्थळाचा पत्ता: http://www.misalpav.com/
(स्त्रोत - ऑर्कुट)
No comments:
Post a Comment